स्प्राऊट : नाविन्यपूर्ण जैविक उत्तेजक स्प्राऊटच्या फवारणीमुळे पिकांत विविध घटकांची निर्मिती होण्यास मदत होते जसे अस्पर्टिक अॅसिड आणि ग्लूटामिक अॅसिड, इंडोल अॅसिटिक अॅसिड व सायटोकायनिन्स इ. या घटकांमुळे द्राक्षपिकात घडांची निर्मिती जोमदार होते, शेंडावाढ चांगली होते, मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या शोषणास व वहनास मदत होते.
द्राक्षात स्प्राऊटची प्रथम फवारणी छाटणीनंतर १४ ते १७ दिवसांनी सुरू करावी. केळीमध्ये लागवडीनंतर ३ महिन्यानंतर व इतर पिकांमध्ये फुलोरा अवस्थेमध्ये फवारणी सुरू करावी.
फवारणी : १.५ ते २ मिली / प्रति लिटर पाणी.
द्राक्ष : २५० मिली प्रति एकर
कापुस व भाजीपाला : २५० मिली प्रति एकर.
सर्व प्रकारच्या किटकनाशके, बुरशीनाशके, वाढ नियंत्रक आणि विद्राव्य खतांमध्ये मिसळता येते. क्षारीय औषधांमध्ये मिसळू नका.