कंपनी प्रोफाइल

अ‍ॅग्रि सर्च (इंडिया) प्रा.लिमिटेड ची स्थापना इ.स. २००० मध्ये आणि मृगधारा अ‍ॅग्रो (इंडिया) प्रा. लिमिटेड ची स्थापना इ.स २०१२ मध्ये येथे झाली. या दोन्ही कंपन्यांच्या द्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पिक संरक्षणासाठी लागणार्‍या विविध दर्जेदार उत्पादनांची निर्मिती आम्ही स्वसंशोधनातून केली आहे. आम्ही सर्व प्रकारच्या पिकांसाठी विविध प्रकारची जैविक सेंद्रिय आणि रासायनिक खतांची निर्मिती करीत आहोत. उदा. अमिनो असिड चिलेट्स, इडिटीए चिलेट्स, सरळसुक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रीय स्वरूपातील सुक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रीय खते, ह्युमिक असिड, विद्राव्य खते, नैसर्गिक जैव उत्तेजके, कृषी रसायनांची कार्यक्षमता वाढवणारे अ‍ॅडज्युवंट, भु आणि जल सुधारके, जैविक खते इ. निविष्टांची आम्ही निर्मिती करतो, या उत्पादनांची तांत्रिक माहीती, त्यांचा वापर करण्याचे फायदे, वापरण्याची पद्धत, वापरण्याचे प्रमाण, मिश्रणक्षमता आणि उपलब्ध पॅकिंग ह्या विषयाची तांत्रिक माहिती या पुस्तिकेद्वारे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत.

आम्हाला कृषी निविष्ठा उत्पादनांमध्ये उल्लेखीय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आजच्या युगात सेंद्रिय, विषमुक्त शेतीसाठी लागणारी अनेक उत्पादने आम्ही तयार करतो. आमच्या उत्पादनाची काही देशांमध्ये निर्यात देखील करतो. कंपनी आय.एस.ओ. ९००१:२०१५ आणि १४००१:२०१५ प्रमाणित आहे.

आम्हाला पुर्ण विश्वास आहे की आपण या उत्पादनांचा वापर आमच्या तांत्रिक अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाने आपल्या शेतीमध्ये करून विविध पिकांचे दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन घेवू शकाल.

उद्दिष्टे

ग्राहकाद्वारे चालवलेल्या कंपनीवर राहण्यासाठी, अत्याधुनिक उत्पादनांसह आणि शेती सल्लामसलत सेवेसह ग्राहकांना आनंद द्या आणि अशा प्रकारे मार्केट लीडर पूर्ण पौष्टिक पोषण कंपनी व्हा.

मूलभूत प्रयोजन

शेतकर्यांच्या चेहर्यावर मुस्करा आणून उत्कृष्टता प्राप्त करणे

मूलभूत मूल्य

  • पायनियर म्हणून
  • उत्कृष्टता
  • प्रत्येकाचा आदर करा
  • वचनबद्धता
  • डेटाबेस निर्णय मेकिंग