प्रिय शेतकरी / विक्रेते बंधुनो,
अॅग्रि सर्च (इंडिया) प्रा. लिमिटेड ची स्थापना 2000 मध्ये नाशिक येथे झाली. आम्ही कंपनीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व पिकसंरक्षण यासाठी लागणाऱ्या विविध दर्जेदार उत्पादनांची निर्मिती अथक परिश्रम व संशोधनाच्या माध्यमातून केली आहे.विविध प्रकारची अन्नद्रव्य युक्त खते, मिनो अॅसिड चिलेट्स, ईडीटीए चिलेट्स, सुक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय सुक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खते, ह्युमिक असिड, विद्राव्य खते, नैसर्गिक जैव उत्तेजके, औषधाची कार्यक्षमता वाढवणारे घटक, पिक वाढ नियंत्रक, जमीन व पाणी सुधारके इ. ची निर्मिती अॅग्रि सर्च उद्योग समूहातून केली जाते. या उत्पादनांची तांत्रिक माहिती व त्यांच्या वापरामुळे पिकाला होणारा फायदा, वापरण्याचे प्रमाण, मिश्रण अनुकुलता तसेच उपलब्ध पॅकिंग ह्याची एकत्रित माहिती या वेब साइटद्वारे आपल्यापर्यत पोहचवत आहोत.
आपल्या कृषि निविष्ठा उत्पादनांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. आजच्या युगात सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या (विषमुक्त) निविष्ठांचे देखिल उत्पादन आम्ही करतो. कंपनी ISO ९००१ : २०१५ आणि १४००१ : २०१५ प्रमाणित आहेव सर्वोच्च MSE-1 CRISIL Rating प्राप्त आहे.

आम्हाला पूर्ण विश्वास आहे की निविष्ठांच्या योग्य वापरामुळे आपण घेत असलेल्या विविध पिकांमध्ये अधिक गुणवत्ता मपूर्ण व दर्जेदार निर्यातक्षम उत्पादन घेवू शकाल.
धन्यवाद !
आपला शुभचिंतक,
प्रदिप एम. कोठावदे
अॅग्रि सर्च (इंडिया) प्रा. लिमिटेड , नाशिक