तापमानातील अचानक चढउतार : पिकांवरील ताण आणि प्रभावी व्यवस्थापन उपाय
हिवाळ्यात दिवस–रात्र तापमानात मोठा फरक दिसतो. दिवसाचे तापमान 28–30°C तर रात्री 7–8°C पर्यंत खाली जात आहे. हा ‘Diurnal Variation’ पिकांमध्ये ताण निर्माण करणारा प्रमुख घटक आहे.
तापमानातील फरकामुळे पिकांमध्ये काय बदल होतात?
दिवसा वाष्पोत्सर्जन वाढते. रात्री अचानक थंडी वाढल्याने स्टोमॅटा बंद होतात, कोशिकांतील द्रव घट्ट होतो आणि ऊतकांमध्ये सूक्ष्म ताण वाढतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडते, वाढ मंदावते, फळधारणा कमी होते आणि फळांवर हलके क्रॅक दिसू शकतात.
व्यवस्थापन उपाय
1. बायोस्टिम्युलंट्सचा वापर
अमिनो आम्ले, ह्युमिक–फुल्विक अॅसिड किंवा सी-विड एक्स्ट्रॅक्ट ताण सहनशक्ती वाढवतात.
2. कॅल्शियम + बोरॉन
कोशिकाभित्ती मजबूत होते. फळ क्रॅकिंग कमी होते.
3. पोटॅशियम व्यवस्थापन
पाण्याचे नियमन सुधारते व तापमानातील बदलाचा परिणाम कमी होतो.
4. झिंक व मॅंगनीज
थंडीत मंदावणाऱ्या एन्झाइम क्रिया सक्रिय राहतात.
5. फवारणीची योग्य वेळ
सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी अधिक प्रभावी ठरते.
6. मल्चिंग
मातीतील तापमान स्थिर राहते व ओलावा टिकतो.
7. सिंचनाचे नियोजन
थंड रात्रींच्या आधी हलके सिंचन मुळांना उष्णता देते.