दर्जेदार व निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी शास्त्रीय शेती, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनासह आधुनिक तंत्रज्ञानाची गरज

  • मुखपृष्ठ
  • दर्जेदार व निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी शास्त्रीय शेती, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनासह आधुनिक तंत्रज्ञानाची गरज
  • दर्जेदार व निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी शास्त्रीय शेती, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनासह आधुनिक तंत्रज्ञानाची गरज

    दर्जेदार व निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी शास्त्रीय शेती, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनासह आधुनिक तंत्रज्ञानाची गरज

    Posted on : 05 Jan 2026 By : Agri Search (India) Pvt. Ltd.

    अमरावती येथील श्री छञपती शिवाजी महाराज सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एक दिवसीय संञा व मोसंबी पिकावरील तंञपुष्प परिसंवादा प्रसंगी अ‍ॅग्रि सर्च इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदिप कोठावदे यांनी या दोन्ही फळ उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना वरील महत्वाचा  संदेश दिला. 

    या नंतर डॉ. हरिहर कौसडीकर (मृद विज्ञान विभाग प्रमुख, वनामकृ.वि., परभणी) यांनी “दर्जेदार संत्रा-मोसंबी उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य व संगोपन”या विषयावर सखोल माहिती दिली.

    डॉ. योगेश इंगळे (सहयोगी प्राध्यापक, डॉ. प.कृ.वि., अकोला) यांनी कीड व रोग व्यवस्थापनाचे शास्त्रीय तंत्र समजावून सांगितले,तर डॉ. राजेंद्र वानखेडे (कृषी विज्ञान केंद्र,अचलपूर) यांनी लागवड ते काढणीपर्यंत घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी मांडल्या.   प्रसिद्ध संत्रा सल्लागार डॉ. गोपाळ भक्ते यांनी खत व सिंचन व्यवस्थापना सोबतच शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांवर प्रभावी उपाय सुचवले. 

    दुपारच्या सत्रात डॉ. सतीश भोंडे यांनी माती, पाणी व पानदेठ तपासणीवर आधारित अमरावती व नागपूर विभागासाठी शिफारसी सादर केल्या. 

    डॉ. ओमप्रकाश हिरे यांनी प्रत्यक्ष शेतातील प्रयोग व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.   डॉ.प्रविण बिसेन यांनी “अ‍ॅग्री सिट्रस” या मोबाईल अ‍ॅपचे सादरीकरण करून डिजिटल तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त ठरू शकते हे स्पष्ट केले.‘तुमचे प्रश्न – आमचे उत्तर’ यासत्रात उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले. डॉ.लक्ष्मीकांत कलंत्री, माजी रेशीम संचालक, यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले.    या परिसंवादासअ‍ॅग्री सर्च व मृगधारा अ‍ॅग्रोचे संचालक सुधाकर गानू,अरुण मुळाने व  दिनकर बोरोले,तसेच झोनल मॅनेजर भारत तिवारी,रिजनल मार्केटिंग मॅनेजर डॉ. प्रवीण देशमुखसह संपूर्ण टीम उपस्थित होती.   

    परिसंवादाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित शेतकरी वर्गाने अ‍ॅग्रि सर्च (इंडिया) प्रा. लि.,मृगधारा अ‍ॅग्रो प्रा. लि. आणि मृदगंध फाऊंडेशन यांचे विशेष अभिनंदन करत, अशा उपयुक्त तंत्रपुष्प कार्यक्रमांची परंपरा कायम ठेवावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.