फॉस्फरस — झिंक व लोहाचा छुपा विरोधक
शेतकरी फॉस्फरस (P) नियमित देतात, पण जास्त प्रमाणात दिल्यास तो झिंक (Zn) आणि लोह (Fe) यांचा मोठा विरोधक ठरतो. या समस्येला Phosphorus-Induced Deficiency असे म्हणतात. यामध्ये झिंक–लोह जमिनीत असतात, पण पिकाला मिळत नाहीत.
विरोध कसा होतो?
जमिनीत P जास्त झाल्यावर तो झिंक व लोहाशी अभिक्रिया करून अविद्राव्य संयुगे तयार करतो. ही संयुगे पाण्यात न विरघळल्यामुळे मुळांना शोषता येत नाहीत.
पिकाच्या आतही जास्त P मुळे झिंक व लोहाच्या हालचाली (translocation) मध्ये अडथळा येतो. त्यामुळे ते पानांपर्यंत पोहोचत नाहीत.
पिकात दिसणारी लक्षणे
• शिरांदरम्यान पिवळी पाने
• खुंटलेली वाढ
• कमजोर फुले
• कमी उत्पादन
ही समस्या विशेषतः क्षारीय व चुनखड जमिनीत जास्त दिसते.
उपाय काय?
• जमिनीत P जास्त असल्यास काही हंगाम फॉस्फरस कमी करा किंवा थांबवा.
• झिंक–लोह chelated किंवा विद्राव्य स्वरूपात द्या (EDTA, amino chelates).
• जैविक खते वापरा (रुटांझा, कन्सर्ट).
• त्वरीत परिणामासाठी झिंक व लोह फवारणी करा.
• सेंद्रिय पदार्थ / लिओनार (ह्युमिक ऍसिड) वापरा.
• सुरुवातीच्या टप्प्यावर DAP जास्त प्रमाणात देणे टाळा.
• क्षारीय जमिनीत सल्फर किंवा आम्लीय खते वापरा.
अन्नद्रव्यांचा समतोल वापर म्हणजे निरोगी वाढ, हिरवी पाने आणि चांगले उत्पादन.