कृषीमध्ये अमिनो अॅसिडचे फायदे
अमिनो अॅसिड हे नैसर्गिक संयुगे आहेत, जी वनस्पतींच्या वाढीसाठी आणि उत्पादनक्षमतेसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. शेतीमध्ये यांचा वापर केल्यास खालीलप्रमाणे अनेक फायदे मिळतात:
1. ताणप्रतिबंधक क्षमता वाढवते
दुष्काळ, उष्णता किंवा थंडी अशा प्रतिकूल हवामानात अमिनो अॅसिड पिकांची सहनशक्ती वाढवतात आणि पिकांची वाढ नियमित ठेवतात.
2. पोषणद्रव्यांचे शोषण सुधारते
अमिनो अॅसिड मुळे मुळ्यांची क्रियाशीलता वाढते व खतांतील आवश्यक अन्नद्रव्यांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते.
3. फुलधारण आणि उत्पादन वाढवते
हे हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे अधिक फुलधारण, परागसिंचन आणि चांगल्या दर्जाचे फळधारण होते.
4. प्रकाशसंश्लेषण वाढवते
अमिनो अॅसिड मुळे क्लोरोफिलचे प्रमाण वाढते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण सुधारते आणि वनस्पतीला आवश्यक ऊर्जा उपलब्ध होते.
5. मातीचे आरोग्य सुधारते
जेव्हा अमिनो अॅसिड मातीमध्ये वापरले जातात, तेव्हा ते फायदेशीर सूक्ष्मजीवांना पोषण देतात आणि मातीची रचना सुधारतात.