ब्लॉग डिटेल

  • Antioxidants – पिकांचे Life Jacket

    Antioxidants – पिकांचे Life Jacket

    Posted on : 30 Jan 2026 By : Agri Search (India) Pvt. Ltd

    Antioxidants – पिकांचे Life Jacket

    आजच्या बदलत्या हवामानात शेती करणे अधिकच आव्हानात्मक बनले आहे. उष्णतेच्या लाटा, थंडी, पाण्याचा ताण, क्षारयुक्त जमीन, कीड-रोग आणि सततच्या रासायनिक फवारण्या यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. हा ताण केवळ बाहेरून दिसत नाही, तर झाडाच्या आतल्या पेशींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असतो. त्यामुळे ताण व्यवस्थापन हे आधुनिक शेतीतील अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान ठरले आहे.

    Antioxidants म्हणजे काय?

    जेव्हा झाडावर जैविक किंवा अजैविक ताण येतो, तेव्हा झाडाच्या पेशींमध्ये Reactive Oxygen Species (ROS) नावाचे अपायकारक घटक तयार होतात. हे घटक पानांमधील क्लोरोफिल कमी करतात, प्रकाशसंश्लेषणावर परिणाम करतात, फुलगळ वाढवतात आणि फळांची वाढ थांबवतात. या अपायकारक घटकांना निष्क्रिय करून झाडाच्या पेशींचे संरक्षण करणारे घटक म्हणजे Antioxidants.

    म्हणूनच Antioxidants हे झाडासाठी जीवनरक्षक जाकीट म्हणजेच Life Jacket प्रमाणे काम करतात.

    महत्त्वाचे Antioxidants आणि त्यांचे कार्य

    Glycine हा ताण कमी करणारा महत्त्वाचा घटक आहे. तो उष्णता, रासायनिक औषधांचा ताण आणि वातावरणीय बदलांपासून झाडाचे संरक्षण करतो. तसेच प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया सुरळीत ठेवून नवीन पेशी मजबूत बनवतो.

    Fulvic Acid अन्नद्रव्ये सुरक्षितपणे पेशींमध्ये पोहोचवतो. ताणामुळे होणारे अंतर्गत नुकसान कमी करतो आणि मुळे व पाने कार्यक्षम ठेवतो.

    Amino Acids ताणामुळे खराब झालेल्या पेशी दुरुस्त करतात. फुलधारणा आणि फळधारणा टिकवून झाडाला पुन्हा जोमात आणतात.

    Vitamin C म्हणजे Ascorbic Acid हा पाण्यात विरघळणारा Antioxidant आहे. तो झाडाच्या पेशींमध्ये तयार होणारे अपायकारक ऑक्सिजन कण निष्क्रिय करतो, उष्णता व दुष्काळाचा ताण कमी करतो आणि प्रकाशसंश्लेषण सुरळीत ठेवतो.

    Vitamin E म्हणजे Tocopherol हा पेशींच्या भिंतींचा रक्षक आहे. तो पेशींच्या आवरणाचे संरक्षण करतो, उष्ण व कोरड्या हवामानात पेशी फुटू देत नाही आणि फळांची गुणवत्ता, आकार व चमक सुधारतो.

    Antioxidants कधी द्यावेत?

    Antioxidants फुलोरा येण्याच्या आधी, फुलगळ सुरू झाल्यास, फळधारणा व फळवाढीच्या टप्प्यावर द्यावेत. उष्णतेची लाट, थंडी किंवा पाण्याचा ताण दिसताच तसेच कीटकनाशक किंवा तणनाशक फवारणीनंतर तीन ते चार दिवसांनी Antioxidants देणे उपयुक्त ठरते.

    फवारणीची योग्य वेळ

    फवारणी सकाळी सात ते दहा या वेळेत किंवा सायंकाळी चार नंतर करावी. पानांवर ओल टिकेल अशी वेळ निवडल्यास Antioxidants चा परिणाम अधिक प्रभावी दिसून येतो.

    निष्कर्ष

     

    Antioxidants म्हणजे उत्पादन वाढवणारे खत नाहीत, तर झाडाला ताणापासून वाचवणारे संरक्षण कवच आहेत. आजच्या हवामानात Glycine, Fulvic Acid, Amino Acids आणि Vitamins यांचा संतुलित वापर म्हणजे पिकांसाठी खरे Life Jacket आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर अनेक पिके ताणातून नक्कीच वाचतील.