ब्लॉग डिटेल

  • यशस्वी फवारणीसाठी ७ सुवर्णनियम

    यशस्वी फवारणीसाठी ७ सुवर्णनियम

    Posted on : 22 Jan 2026 By : Agri Search (India) Pvt. Ltd

    यशस्वी फवारणीसाठी ७ सुवर्णनियम

    फवारणी ही शेतीतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. औषध चांगले असले तरी फवारणी चुकीची असेल, तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे खाली दिलेले ७ सुवर्णनियम प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

    १) योग्य औषधाची निवड करा
    पिकाची अवस्था, रोग किंवा कीड, तसेच अन्नद्रव्यांची आवश्यकता ओळखूनच औषध किंवा खत निवडावे. फक्त अंदाजाने किंवा शेजाऱ्याच्या सल्ल्याने फवारणी करू नये.

    २) पाण्याची गुणवत्ता तपासा
    जड (Hard) किंवा मळकट पाण्यात औषध नीट मिसळत नाही आणि परिणाम कमी होतात. अशावेळी योग्य adjuvant किंवा water conditioner वापरणे आवश्यक असते.

    ३) योग्य अ‍ॅडजुव्हंटचा वापर करा
    फवारणी प्रभावी होण्यासाठी अ‍ॅडजुव्हंट महत्त्वाची भूमिका बजावतात. पोषण आणि सिस्टेमिक औषधांसाठी Non-ionic adjuvant वापरणे सुरक्षित ठरते, तर संपर्क क्रियेसाठी Anionic adjuvant वापरता येतो.

    ४) शिफारस केलेली मात्रा पाळा
    अतिमात्रेमुळे पाने जळणे, फळगळ आणि उत्पादन घटण्याचा धोका असतो. त्यामुळे लेबलावर दिलेली शिफारस केलेली मात्रा काटेकोरपणे पाळावी.

    ५) फवारणीची योग्य वेळ निवडा
    फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. दुपारी तीव्र उन्हात, जोरदार वाऱ्यात किंवा पावसाआधी फवारणी टाळावी.

    ६) फवारणीची पद्धत योग्य ठेवा
    फवारा बारीक असावा आणि औषध पानांच्या दोन्ही बाजूंवर समान बसले पाहिजे. फक्त ओलसरपणा येईल इतपतच फवारणी करणे योग्य.

    ७) फवारणीनंतर निरीक्षण करा
    फवारणीनंतर २ ते ३ दिवस पिकांचे निरीक्षण करावे. काही विपरीत परिणाम दिसल्यास पुढील फवारणी थांबवावी.

     

    निष्कर्ष
    फवारणी ही फक्त औषध मारण्याची क्रिया नसून ती एक शास्त्र आहे. योग्य औषध + योग्य अ‍ॅडजुव्हंट + योग्य वेळ = यशस्वी फवारणी. योग्य फवारणीचे तंत्र पाळल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते.