झिंक ऑक्साइड ३९.५ % तीव्र द्रावण

झिंकॉल हे अतितीव्र वहनशील जस्ताचे द्रावण आहे. यामध्ये ३९.५ % वजनावर आधारित जस्त आहे. जास्त प्रमाण असल्याने हा पिकांना कमी प्रमाणात द्यावा लागतो. पानांद्वारे जलद गतीने शोषण होते आणि परिणाम दीर्घकाळ पर्यंत मिळत राहतात. झिंकॉल जड धातू आणि इतर अनावश्यक घटकापासून मुक्त आहे कारण हे अतिशुद्ध स्तोत्रापासून सुयोग्य पद्धतीने तयार केले जाते. झिंकॉल मध्ये चिपकवणारे, ओलसरपणा टिकवणारे, पसरवणारे आणि स्थैर्य देणारे काही घटक समाविष्ट केलेले असल्याने हे वापरण्यास सुलभ आणि सुरक्षित आहे. पावसातही झिंकॉलचे शोषण होते व कार्यक्षमता टिकून राहते.

Benefits

  • ज्या जमिनींमध्ये झिंकचे प्रमाण कमी आहे अशा जमिनीत आणि झिंकप्रेमी पिके जसे मका, केळी, टोमॅटो, हळद, संत्री, द्राक्ष, इ मध्ये वापरण्यास अत्यंत उपयुक्त.
  • झिंकॉलचा वापर केल्याने, झिंकची कमतरता भरून निघते. पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते. भात पिकामध्ये येणार्‍या खैरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी झिंकॉल सहायक आहे.

Dose

झिंकॉल फवारणीद्वारे देण्यासठी १०० ते २०० मिली प्रति एकर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी (०.५ ते १ मिली प्रति लिटर पाणी)

Compatibility

झिंकॉल सर्व प्रकारच्या कृषी रसायनांसोबत मिश्रणक्षम आहे आणि टँक मिस मध्ये वापरता येते, तरीपण एकत्रित वापरण्या अगोदर जार चाचणी इतर कृषी रसायनांसोबत करून खात्री करावी.

Available Packing

१०० मिली 25० मिली 5०० मिली १ लिटर