सिल-वॉल विशेष तंत्रज्ञानाने तयार केलेले बायोअॅक्टीव सिलिकॉन आहे. हे सिलिकाचे संमिश्र रूप आहे जे पिकास पाण्यासोबत उपलब्ध होते आणि स्थिर मोनोसिलिसिक असिड आणि ऑर्थोसिलिसिक असिडमध्ये परावर्तित होते. पिकावर फवारणी केल्यानंतर पेशीभित्तिकाच्या बाह्य पृष्ठभागावर सिलिकॉन जमा झाल्यावर अधिक मजबूत पेशी भित्तिका तयार होतात. पेशीमध्ये उपलब्ध द्रवावर दबाव वाढतो आणि तो पिकाच्या सर्व भागांमध्ये समान रीतीने पसरतो. रोग आणि कीटकांसाठी पिकामध्ये एक प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण होते.
फवारणी -२०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाणी (१ ग्रॅम प्रति लिटर) जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी सिलवॉल आणि हेल्मेट या दोन उत्पादनांची एकत्र फवारणी फायदेशीर असल्याचे अनेक निष्कर्ष आहेत.
पिकांवर वापरली जाणारी सर्व प्रकारची खते आणि औषधे सिल-वॉल सोबत दिली जाऊ शकतात.