ऑरगॅनो सिलिकॉन सुपर स्प्रेडर

ऑरसील : ऑरगॅनो सिलिकॉनवर आधारीत पॉलीइथर ट्रायसिलोझेन युक्त सुपर स्प्रेडर आहे. ऑरसिल औषध पानांवर पसरवण्यासाठी प्रभावी आहे. हे पोषक तत्व आणि आंतर-प्रवाही किटकनाशके चांगले शोषून घेण्यास पिकाला मदत करते.

वापरण्याची पद्धत: किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, वनस्पती वाढ संजिवके, विद्राव्य खते आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांसोबत वापरताना त्यांचे योग्य प्रमाण घ्या व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, आधी ९०% पाण्याचे प्रमाण टँकमध्ये भरा आणि नंतर ऑरसिल पाण्यात टाका. राहिलेले पाणी भरा. चांगले मिसळा आणि फवारणी करा.

Benefits

  • ऑरसील पानांच्या पृष्ठभागावरील ताण आश्चर्यकारकरित्या कमी करून फवारणीचे द्रावण पिकांच्या पानांच्या पृष्ठभागावर सरळ पसरवते त्यामुळे किटकनाशके/बुरशीनाशके व खतांची परिणामकारकता मोठ्या प्रमाणात वाढते. पानावरील रंध्रांद्वारे ही रसायने सहजरित्या आत प्रवेश करतात. त्यामुळे औषधांची मात्रा कमी केली तरी ऑरसील मुळे त्याचे परिणाम उत्तम मिळतात.
  • ऑरसिल चा वापर कोणत्याही प्रकारच्या किटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकाची उपयुक्तता वाढवण्यासाठी करता येतो.

Dose

स्पर्शजन्य किटकनाशकासाठी : ०.१ मिली प्रति लिटर पाणी
आंतरप्रवाही किटकनाशकासाठी : ०.२ मिली/ प्रति लिटर पाणी
सर्व खते आणि वनस्पतींच्या वाढ नियंत्रकांसाठी : ०.१ मिली प्रति लिटर पाणी

Compatibility

सर्व प्रकारच्या कृषी औषधे आणि खतांसोबत उपयोग करू शकता.

Available Packing

४० मिली 10० मिली 25० मिली 50० मिली १ लिटर 5 लिटर