क्षारदा

जलसुधारक (वॉटर कंडिशनर)

क्षारदा हे फवारणीच्या पाण्याचा सामू योग्य राखण्यासाठी उत्तम जलसुधारक आहे. जड पाण्यामध्ये बर्‍याचशा रसायनांमधील सक्रिय तत्वे कॅल्शियम, मॅग्नेशियम, कारर्बोनेट, बायकार्बोनेट यांच्याशी संयोग पावतात व त्यात अविद्राव्य साका तयार होतो, आपण त्यास द्रावण फाटणे असे म्हणतो. त्यामुळे वापरलेली खते आणि रसायने पिकांना बहुतांशी परिणामकारक ठरत नाहीत. पाण्याचा सामू ७ पेक्षा कमी असल्यास पाणी आम्लधर्मी बनते व सामू ७ पेक्षा जास्त असल्यास विम्ल किंवा क्षारीय बनते. फवारणीच्या द्रावणाचा सामू ५.५ ते ६.५ असावा. त्यासाठी पाण्याच्या जडत्वानुसार व त्याच्या सामू नुसार क्षारदा हे जलसुधारक पाण्यात मिसळावे.

Benefits

  • पाण्याचा सामू योग्य झाल्याने फवारणीसाठी वापरलेल्या औषधांचा चांगला परिणाम मिळतो. खारटपणा असलेल्या पाण्याची विद्यूतवाहकता जास्त असते.
  • अशा पाण्यात लोराईडयुक्त क्षारांचे प्रमाण अधिक असते. असे क्षार पिकांच्या पानांना इजा करतात व त्यामुळे फवारणी केलेल्या रसायनांचा योग्य परिणाम साधता येत नाही. ही विद्यूतवाहकता क्षारदामुळे नियंत्रित होते व रसायनांचा अपेक्षित परिणाम साधता येतो.

Dose

०.५ मिली ते १.२५ मिली प्रति लिटर पाण्याचा सामु व जडत्वानुसार.

Compatibility

सर्व प्रकारच्या खते व औषधांसोबत मिसळता येते. पाण्यात क्षारदा प्रथम मिसळून नंतर औषध/रसायन मिसळावे.

Available Packing

१०० मिली 25० मिली 5०० मिली १ लिटर 5 लिटर