इनफ्युज हे सिलिकॉन सर्फेकटंट आणि संत्र्याच्या साली पासून काढलेला अर्क या पासुन तयार केलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे एक सुपर अॅडज्युवन्ट आहे. फवारणीच्या द्रावणामध्ये इनफ्युज वापरल्याने किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, वनस्पती वाढ नियंत्रक आणि फवारणीद्वारे दिल्या जाणारे अन्नद्रव्ये यासारख्या कृषी रसायनांची जैव-कार्यक्षमता सुधारते.
वापरण्याची पध्दत: किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, वनस्पती वाढ संजिवके, विद्राव्य खते आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांसोबत वापरताना त्यांचे योग्य प्रमाण घ्या व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, आधी फक्त ९०% पाणी टँकमध्ये भरा आणि नंतर इनफ्युज पाण्यात टाका. राहिलेले पाणी भरा, चांगले मिसळा आणि फवारणी करा.
सूचना : पॉलीहाऊस सारख्या सुरक्षित शेतीत जास्त प्रमाण घेऊ नका. त्याचा विपरीत परिणाम होत नसला तरीही काळजी घ्यावी.
किटकनाशक, कोळीनाशक, बुरशीनाशक, वनस्पती वाढ संजिवक सोबत १०० मिली ते १५० मिली प्रति १००लिटर द्रावणात.
तणनाशकासाठी - २०० मिली प्रति १०० लिटर द्रावणात
सर्व प्रकारच्या खते आणि औषधांमध्ये मिसळता येते. जैविक किटकनाशकांसोबत देखील एकत्रित देता येते.