एक्सीड अॅमिनो असिड सोबत चिलेशन करून तयार केलेले अत्यंत प्रभावशाली व किफायतशीर सुक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण आहे. एक्सीड मध्ये झिंक, बोरॉन, कॉपर, फेरस, मँगनीज व मॉलिब्डेनम ही सुक्ष्मअन्नद्रव्ये अॅमिनो अॅसिड्स चिलेटेड स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे पिकांकडून सहज व जलद शोषण होते. एक्सीड पाण्यात १००% विद्राव्य व वापरण्यास सोपे आहे.
सूचना : लहान मुलांपासुन सुरक्षित ठेवा, डोळ्यांना स्पर्श होऊ देऊ नका, उन्हात आणि ओल्या जागी उघडे ठेवू नका.
फवारणी : १.२५ ग्रॅम प्रति लिटर पाणी. पिक अन्नद्रव्यांची कमतरता दाखवत असल्यास २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी. पिकांच्या गरजेनुसार व कालावधीनुसार २ ते ४ वेळा फवारण्या कराव्यात.
एक्सीड अल्कधर्मीय औषधासोबत मिसळू नये. इतर जवळपास सर्व किटकनाशके, बुरशीनाशके व विद्राव्य खतांसोबत मिश्रण करून वापरता येते.