कॅलमिनो मध्ये ११ % कॅल्शियम अन्नद्रव्य आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर होणारा अनिष्ठ परिणाम टाळण्यासाठी कॅलमिनोचा वापर आवश्यक आहे. कॅलमिनोचा वापर डाळवर्गीय पिके / शेंगावर्गीय पिके, तृणधान्ये, भाज्या, बटाटे, कोबी, फुलकोबी, टोमॅटो, पालेभाज्या आणि फळबागा जसे द्राक्ष, केळी, संत्री/मोसंबी, डाळींब अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये केला जातो.
फवारणी : २.५ मिली प्रति लिटर पाणी
कोणत्याही प्रकारच्या सल्फेटयुक्त आणि फॉस्फेटिक खतांसोबत कॅलमिनोचा वापर करू नये. उत्तम परिणामासाठी बोरॉन (झिलबोर) सोबत वापरावे.