अॅग्रिमोन फ्रुट फ्लाय ट्रॅप

विविध बागायती पिकांमध्ये जसे आंबा, संत्रा, पेरू, डाळिंब, अंजीर आणि भोपळा वर्गीय पिके जसे काकडी, टरबूज, खरबूज, दुधी भोपळा, कारले, दोडके यामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

फळे पिकण्याच्या अवस्थेत रसायने वापरणे योग्य नाही, म्हणून फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध (फेरोमोन) सापळे वापरावे.

हे कामगंध सापळे शेतात लागवडीच्या वेळी लावल्यावर या फळमाशांच्या नर प्रौढांना आकर्षित करते आणि पुनरुत्पादनात अडथळा आणते आणि किडीचा जीवनक्रम बाधित होवून फळमाशीचा प्रादुर्भाव कमी होतो.

काकडी वर्गीय पिकांसाठी Bactrocera cucurbitae चे ल्युर व सापळे तसेच फळ वर्गीय पिकांसाठी Bactrocera dorsalis चे ल्युर व सापळे फळ माशींच्या नियंत्रणासाठी उपलब्ध आहेत.

Available Packing

ट्रॅप्स आणि ल्युर