कंसर्ट

एन.पी.के. कर्न्सोशिया (जैविक खतांचे मिश्रण)

कंसर्ट एक द्रवरूप जैविक मिश्रण खत आहे, ज्यात नत्र स्थिर करणारे, स्फुरद विद्राव्य करणारे, पोटॅश वहन वाढवणारे, झिंक विद्राव्यता वाढवणारे उच्च गुणवत्तेचे जिवाणु एकत्रित उपलब्ध आहेत. यामुळे शेतकर्‍यांना जैविक खतांचे सगळे लाभ मिळतात. कंसर्ट मध्ये रायझोबियम, अ‍ॅझोटोबॅटर, अ‍ॅझोस्पिरीलीयम, पी.एस.बी., के.एम.बी., झेड.एस.बी. आणि उपयुक्त रोग प्रतिबंधक जिवाणु यांचे प्रमाण किमान 1x108 सी.एफ.यु. प्रति १ मिली आहे.

Benefits

  • बियाणे उगवण गती आणि वनस्पतींच्या वाढीचा वेग वाढतो. पिकाच्या आरोग्यात आणि उत्पादनात वाढ होते. रासायनिक खतांचे प्रमाण २० ते २५% कमी करू शकता आणि १५ ते २०% उत्पादनात वाढ होऊ शकते. जमिनीचे आरोग्य सुधारते.

Dose

जमिनीची प्रक्रिया: १ लिटर कंसर्ट ५० किलो कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत किंवा इतर सेंद्रिय खतामध्ये मिसळून १० दिवस सावलीत पुरेसा ओलावा असलेल्या जागी ठेवा आणि नंतर एक एकर क्षेत्रात जमिनीत पेरणी किंवा लागवडीचे वेळी मिसळा. बिज प्रक्रिया : १० मिली कंसर्ट प्रति किलो बियाण्यामध्ये मिसळून बियाण्याला हळुवार चोळा. बियाणे सावलीत वाळवा आणि पेरणी करा. ड्रेचिंग (आळवणी): १ लिटर कंसर्ट २०० लिटर पाण्यात घेऊन मिश्रण तयार करावे आणि ते झाडाच्या मुळांना द्यावे (एक एकरसाठी). मुळांची प्रक्रिया : १० मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण तयार करा आणि रोपाची मुळे या मिश्रणात प्रत्यारोपण (पुर्नलागवड) करण्यापूर्वी १० मिनिटे बुडवून ठेवा आणि नंतर प्रत्यारोपण करा.

Compatibility

मिश्रणक्षमता : कंसर्ट रासायनिक औषधांमध्ये मिसळू नका, रासायनिक खतांमध्ये मिसळू नका आणि थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. कंसर्ट ला ओरिजीनो, रुटांझा, बायोरिदम आणि प्रोबियॉन यांच्या सोबत दिल्याने चांगले परिणाम मिळतात.

Available Packing

१०० मिली २५० मिली ५०० मिली १ लिटर ५ लिटर