ब्लॉग डिटेल

  • पावसाळ्यातील मका पिकासाठी युरिया + रिलीज झिंक (Chelated Zinc) वापरण्याचे फायदे

    पावसाळ्यातील मका पिकासाठी युरिया + रिलीज झिंक (Chelated Zinc) वापरण्याचे फायदे

    Posted on : 28 Jun 2025 By : Agri Search (India) Pvt. Ltd

    पावसाळ्यातील मका पिकासाठी युरिया + रिलीज झिंक (Chelated Zinc) वापरण्याचे फायदे

    मक्याला नायट्रोजन खूप आवडतो – आणि युरिया हे नायट्रोजन देण्याचं सर्वात स्वस्त आणि प्रभावी माध्यम आहे. युरियामुळे झाडाची उंची, पानांची लांबी व रुंदी वाढते आणि एकंदरीत हरित वाढ चांगली होते.

    पण पावसाळ्यात झिंकची कमतरता सामान्य असते. पानांवर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या रेषा दिसतात. याचा थेट परिणाम कणसाच्या आकारावर व दाण्यांच्या भरावावर होतो.

    उपाय? युरियासोबत झिंक मिसळा. पण साधा झिंक नाही—Chelated Zinc वापरा. कारण पावसाळ्यात माती ओली असते आणि साधा झिंक मातीमध्ये लॉक होतो. पण Chelated Zinc मुळांपर्यंत सहज पोहोचतो.

    योग्य मात्रा:
    प्रत्येक 1 गोणी युरिया (45–50 किलो) साठी 500 ग्रॅम Chelated Zinc (Release Zinc) मिसळा.

    कसे मिसळायचे?

    • युरिया एका स्वच्छ प्लास्टिक शीट किंवा जमिनीवर पसरवा

    • त्यावर Chelated Zinc पावडर एकसारखी शिंपडा

    • हाताने किंवा फावड्याने 3–4 वेळा नीट मिसळा

    • झिंकची पावडर युरियाला चांगली चिकटली पाहिजे

    • सावलीत ठेवा आणि शक्यतो त्याच दिवशी शेतात वापरा

    कधी वापरायचे?

    • पहिली मात्रा: पेरणीनंतर 20–25 दिवसांनी

    • दुसरी मात्रा: पेरणीनंतर 40–45 दिवसांनी

    फायदे:

    • मुळे मजबूत होतील, पाने अधिक हिरवी राहतील

    • कणसाची वाढ आणि दाणे चांगले भरतील

    • उत्पादनात वाढ होईल

    • झिंक कमतरतेचा त्रास होणार नाही

     

    नोट: पावसाळ्यात नायट्रोजन लीचिंग (वाहून जाणे) होते, पण झिंकसोबत दिल्याने हे रोखता येते.