वैशिष्ट्ये :
उच्च प्रमाणात अन्नद्रव्यांनी युक्त अनोखे खत: संतुलित अन्नद्रव्य पुरवठा : एक्सलरेट मध्ये सल्फर (५०% पेक्षा जास्त), झिंक (१०%) आणि लोह (५%) या प्रमाणात आहेत, जे पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप आवश्यक आहेत.
सूक्ष्म अन्नद्रव्यांनी भरपूर: झिंक आणि लोह ही मूलद्रव्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे क्लोरोसिस सारख्या समस्येसाठी वरदान आहे.
पाण्यात विद्राव्य आणि घुलनशील स्वरूप आणि वापरण्यास सोपे: प्रवाही मायक्रोग्रॅन्यूल्स: हाताळण्यास आणि वापरण्यास सोपे, संपूर्ण शेतात एकसारखे पसरणे आणि अतिशय प्रभावी परिणाम
हळू हळू उपलब्ध होते (स्लो रिलीज):
एक्सलरेट मधील सल्फर हळू हळू सल्फेट मध्ये रूपांतरित होऊन पिकास दीर्घकाळ अन्नपुरवठा होत असतो.
पिकाचे आरोग्य सुधारणे
पिवळेपणा (कलोरोसिस) व्यवस्थापन: क्लोरोसिसला प्रभावीपणे सुधारते आणि प्रतिबंध करते. हिरवी आणि निरोगी पाने अधिकाधिक प्रकाश संश्लेषण करून किडी आणि रोगास प्रतिबंध करतात.
जास्त प्रकाश संश्लेषण: झिंक आणि लोह यांची हरित द्रव्य निर्मिती (क्लोरोफिल सिंथेसिस) आणि एन्झाइम सक्रियकरणात महत्त्वाची भूमिका आहे, त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेची कार्यक्षमता वाढवते.
जमिनीचे आरोग्य आणि सामू (कि) नियंत्रण:
जमिनीचा सामू कमी होतो: एक्सलरेट मधील अन्नद्रव्ये मातीचा कि कमी करण्यात मदत करतात, ज्यामुळे अल्कधर्मी जमिनीतील अन्नद्रव्ये पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होत राहतात.
एकावेळी ३ किलो प्रति एकर वापरा. आवश्यकतेनुसार आणि आमच्या शेती तज्ञांच्या / शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार गरज असल्यास पुन्हा द्या.
एक्सलरेट फॉस्फेट युक्त खते सोडून जवळपास सर्व खतांसोबत मिश्रनक्षम आहे. विविध प्रकारच्या पिकांसाठी सुसंगत असे खत : आले, हळद, ऊस, धान्य, डाळी, फळे, भाजीपाला आणि नगदी पिकांसह अजून बर्याच पिकांसाठी उपयुक्त आहे.