अ‍ॅसिटोबॅक्टर द्रवरूप जैविक खत

सॅकरम काय आहे ?

सॅकरम हे अ‍ॅसिटोबॅक्टरच्या कार्यक्षम पेशी असलेले द्रवरूप जैविक खत आहे. अ‍ॅसिटोबॅक्टर एक सहयोगी (सिम्बायोटीक)/एंडोफायटीक जीवाणू आहे जो जास्त कर्बोदके असलेल्या वनस्पतीमध्ये राहून वातावरणातील नत्र स्थिरीकरण करण्यास सक्षम आहे. ते वनस्पतींच्या सर्व भागांमध्ये आढळतात.

सॅकरमची वैशिष्ट्ये:

१) सॅकरम या जैविक खतामध्ये अ‍ॅसिटोबॅक्टरच्या पेशींची घनता जास्त आहे. २) शिफारशीनुसार वापर केल्यास प्रति हेक्टर सुमारे ५० किलो पर्ङ्मंत नत्र स्थिर करण्यास सक्षम. ३) रासायनिक नत्राचा वापर २५% पर्यंत कमी होतो आणि २०% ते ३०% अधिक उत्पादन मिळते. ४) ऊस पिकामध्ये हे जीवाणू मुळांवर आणि अगदी देठावर व पानांवरही वास्तव्य करतात त्यामुळे याचा वापर फवारणीच्या माध्यमातूनही करता येतो.

 

Benefits

  • सॅकरम मुळांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि मुळांची घनता व फांद्या वाढीस मदत करते ज्यामुळे पाणी आणि खनिजांचे शोषण वाढते.
  • सॅकरम पिकाच्या वाढीस व पिकाचे उत्पादन वाढीस सहाय्य करते.
  • सॅकरम पिकाला शाश्वत पोषणमूल्य पुरवठा करण्यास मदत करते.
  • सॅकरम हे सेंद्रिय खताप्रमाणेच वनस्पतीला लागणार्‍या नत्र खताची महत्वाची गरज पूर्ण करू शकते.

Dose

कांडे (सेट) उपचार: उसाच्या कांड्या प्रक्रीये साठी १०० लिटर स्वच्छ पाण्यात १ लिटर सॅकरम मिसळून शेतात लागवड करण्यापूर्वी १५ ते २० मिनिटे बुडवावे. जमिनीतून देणे: एकरी १ लिटर सॅकरम ५० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखत/कंपोस्ट/ गांडूळखत किंवा शेतातील बारीक मातीत मिसळून हे मिश्रण सर्‍यांवर उसाला मातीची भर देण्याचे वेळी दयावे. ठिबकच्या माध्यमातून: एकरी १ लिटर सॅकरम २०० लिटर स्वच्छ पाण्यात मिसळून ठिबक संचामधून दयावे. फवारणीद्वारे: १ लिटर स्वच्छ पाण्यात ५ मिली सॅकरम या प्रमाणात द्रावण तयार करून पिकावर फवारणी करावी. चांगल्या परिणामासाठी सकाळी किवा सायंकाळी फवारणी करावी. लक्षित पिके: उस, बीटरूट, गहू, कॉफी, चहा, धान, अननस, केळी, आंबा, ज्वारी, मका, गाजर, मुळा, कॅमेरून गवत इ.

Compatibility

सॅकरम सर्व प्रकारच्या जैविक खते व जैविक बुरशीनाशके, जैविक किडनाशकांसोबत देता येते. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक जीवाणूनाशक (अँटीबायोटीक) सोबत मिसळू नये.

Available Packing

५०० मिली १ लिटर