न्युट्रीबॉन 30

न्युट्रीबॉन ३०++ हे अत्यंत नाविन्यपूर्ण वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्ठ परिपूर्ण खत आहे. ज्यामध्ये प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य अगदी संतुलित स्वरूपात आहेत. आणि वनस्पतींच्या नैसर्गिक वाढीला उत्तेजित करणारे आवश्यक  पदार्थ देखील आहेत.

Benefits

  • एकच उत्पादनाच्या वापराने पिकाची जवळजवळ सर्व पोषक घटकांची गरज पूर्ण होते. न्युट्रीबॉन ३०++ मध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही पोषक तत्वांवर कोणत्याही अन्नद्रव्यांचा परस्पर विरोधी परिणाम होत नाही. सर्व पिकांच्या वाढीच्या अवस्था, फुलोर्‍याची अवस्था आणि फळांच्या आकारमान वाढीचा अवस्थेत उपयुक्त. पिकांची मुळे आणि शेंडा, फांद्या, फुले वाढवण्यास मदत होते. फळांचा आकार वाढतो. न्युट्रीबॉन ३०++ वापरल्याने वनस्पती हिरवीगार बनते आणि रोगांचा प्रतिकार ही करू शकते. त्यामुळे बुरशीनाशकाचा वापर कमी करण्यास मदत होऊ शकते. न्युट्रीबॉन ३०++ च्या वापरामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता, विशेषत: आकार आणि रंग सुधारण्यास मदत होते.

Dose

पिकाच्या अवस्थेनुसार ३ ते ४ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात न्युट्रीबॉन ३०++ ची पानांवर फवारणी करा. आधी आवश्यक न्युट्रीबॉन ३०++ पाण्यात मिसळा, पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत नीट ढवळून घ्या.

Compatibility

न्युट्रीबॉन ३०++ जवळजवळ सर्व साधारणपणे वापरल्या जाणार्‍या कीटकनाशके, बुरशीनाशके आणि खतांसोबत मिश्रणक्षम आहे. तरीही आम्ही मिश्रण करण्यापूर्वी जार चाचणीची शिफारस करतो.

Available Packing

२५० मिली ५०० मिली १ लीटर ५ लीटर