मिनोरा हे नवीन युगाचे प्रभावशाली स्प्रे अॅडीटीव्ह आहे, जे पिकांवर विविध किटक आणि रोगांचे व्यवस्थापन करण्यास मदत करते आणि औषधांचे प्रसरण आणि शोषणासाठी लाभदायक आहे. मिनोरामध्ये सर्वाधिक शुद्धता असलेले पायरिन आणि विशेष सर्फेटंट एकत्रित केले आहे म्हणून ते एक विशेष अॅडीटीव्ह आहे. मिनोरा एक स्थिर आणि उच्च दर्जाचे इमल्शन आहे.
सूचना : जेव्हा तापमान ३५⁰C पेक्षा कमी असेल तेव्हाच मिनोरा वापरावे. फुलांच्या परागीभवन अवस्थेत मिनोराचा वापर शक्यतो करू नये.
फळ पिकांवर फवारणीसाठी ५ मिली प्रति लिटर पाणी. भाजीपाला आणि इतर पिके- २.५ ते ५ मिली प्रति लिटर पाणी. वेगवेगळ्या पिकांमध्ये गरजेनुसार २ ते १० मिली प्रति लिटर पाणी.
सर्व प्रकारच्या औषधांमध्ये मिसळता येते.