किझिंक हे जमिनीतील झिंक विरघळवणारे जिवाणू युक्त जैव खते आहे. ज्यामध्ये अशा जीवाणूंचा समूह आहे जो झिंकचे काही अविद्राव्य स्वरूपाचे बंध तोडून ते वनस्पतींना उपलब्ध करून देतात. झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य वनस्पतीच्या विकास प्रक्रियेसाठी मदत करते, तसेच वाढ संप्रेरक निर्मिती आणि दोन पेरयान मधील अंतर वाढवण्यासाठी देखील मदत करते .
वनस्पतींमध्ये झिंकची भूमिका:
झिंक कार्बोहायड्रेट चयापचय, प्रथिने चयापचय, मेम्ब्रेन अखंडता, ऑक्झीन संश्लेषण, प्रकाश संश्लेषण, पेशी भित्तीकांची अखंडता राखण्यात, तसेच झिंकच्या कमतरतेमुळे होणारे रोग आणि विकृतींना प्रतिकार करण्यात प्रमुख भूमिका बजावते.
झिंक विरघळणार्या जीवाणूंची यंत्रणा:
किझिंक मध्ये झिंक विरघळणारे जिवाणू आहेत जे सेंद्रिय आम्ले (२-केटोग्लुकोनिक ऍसिड आणि ग्लुकोनिक ऍसिड), चेलेटिंग लिगँड्स, जीवनसत्त्वे आणि फायटोहॉर्मोन निर्माण करतात, जे स्थिरावलेल्या झिंक मुलद्रव्याला उपलब्ध करून देण्यास मदत करतात .
जमिनीतून: १ लिटर किझिंक प्रति एकर. कोणतेही सेंद्रिय खत किंवा मातीत मिसळा आणि शेतात एकसारखे पसरवा. ड्रेंचिंग: १ लिटर किझिंक आवश्यक प्रमाणात पाण्यात विरघळवून रूट झोनजवळ त्याचा वापर करा . ठिबकद्वारे: १ लिटर किझिंक पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाण्यात विरघळवा आणि ठिबक प्रणालीद्वारे वापरा.
किझिंक बहुतेक जैविक उत्पादनांशी सुसंगत आहे. तरीही आम्ही स्वतंत्र चाचणीची शिफारस करतो.