केलामृत हे पाण्यात विरघळणारे खत आहे ज्यामध्ये प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित स्वरूपात असतात.
हे घड बाहेर येण्याच्या आणि फळांच्या विकासाच्या वेळी वापरण्यासाठी तयार केले गेले आहे जेणेकरुन पोषणाची मागणी पूर्ण होईल.
केलामृतचा वापर लवकर निसवणीमध्ये मदत करू शकतो आणि परिपक्वतेसाठी लागणारा वेळ कमी करण्यास मदत करू शकतो.
यामुळे फळांची लांबी, गोलाई व वजनात वाढ होते. तसेच घडांची श्रेणी, आकार सुधारतो आणि फळांचा दर्जा देखील वाढतो.
घटकः (N:P:K) 06:05:30 + MgO 2.0 + S 10.0 + Zn 1.0 + B 0.7
निसवणी सुरू होण्याची शयता असताना केळीच्या १००० रोपांसाठी २.५ किलो दराने केलामृत वापरावे आणि किमान ३ वेळा १० दिवसांच्या अंतराने पुन्हा वापरावे. ठिबक सिंचन किंवा ड्रेंचिंगद्वारे प्रति १००० झाडांसाठी एकूण प्रमाण किमान १० किलो असावे.
केलामृत कॅल्शियम युक्त असलेल्या खतांमध्ये मिसळू नये. फक्त रिलिज कॅल्शियम चालेल. इतर कोणत्याही रासायनिक निविष्ठा किंवा खतांमध्ये मिसळण्यापूर्वी आम्ही जार चाचणीची शिफारस करतो.