के२-व्हायब्रंट हे पोटॅशयुक्त चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण खत आहे, जे एका विशेष प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. पिकांसाठी फर्टिगेशन आणि फवारणीद्वारे वापरता येते. के२-व्हायब्रंट मध्ये झिंक, आयर्न, मँगनीज, कॉपर, बोरॉन, मॉलीब्डेनम, चिलेटेड मॅग्नेशीयम, कॅल्शियम आणि पोटॅश (१५%) ही अन्नद्रव्य उपलब्ध आहेत. हि सर्व अन्नद्रव्ये आवश्यकतेनुसार योग्य अवस्थेमध्ये संतुलित प्रमाणात पिकाला उपलब्ध होतात.
पिकाची अवस्था | आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्य |
---|---|
उगवण आणि प्राथमिक वाढ अवस्था | आयर्न, मँगनीज, झिंक |
शाकीय वाढ अवस्था | आयर्न, कॉपर, बोरॉन, झिंक, मँगनीज |
फुलोरा अवस्था | आयर्न, बोरॉन |
पक्वतेची अवस्था | कॉपर, मॉलीब्डेनम, बोरॉन |
फवारणीसाठी : प्राथमिक अवस्थेमध्ये ०.५ ग्रॅम ते १ ग्रॅम प्रति लिटर पाणी, पिकाच्या अन्नद्रव्य कमतरते नुसार आणि स्थितीनुसार फवारणी करावी.
ड्रिपद्वारे : २०० ते ४०० ग्रॅम प्रति एकर
के२-व्हायब्रंट सर्व प्रकारच्या खते आणि औषधांसोबत दिले जाऊ शकते. रिलीज बुन सोबत वापरल्यास विशेष फायदा होतो.