होमन एक प्रभावी आणि शक्तिशाली जैविक उत्तेजक आहे. होमनच्या वापरामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्तेत भरपूर वाढ होते व दर्जाही सुधारतो. 
होमन एन-असिटाईल थायोझोलिडीन-४ कार्बोसीलिक अ‍ॅसिड (ATCA) आणि फॉलिक अ‍ॅसिडचे मिश्रण आहे.

Benefits

  • होमन वनस्पतींमध्ये विविध प्रकारच्या एन्झायमॅटिक प्रक्रियांना प्रोत्साहन देते, परिणामी अधिक फुले येतात व फुलगळ कमी होते. होमन फळ धारणेसाठी आवश्यक संजीवकांची निर्मिती करण्यात मदत करते. होमन किटकनाशक आणि बुरशीनाशकाची कार्यक्षमता वाढवते. होमन प्रतिकूल वातावरणात अतिशय उपयुक्त असून यातील घटक पिकांतील जैव रसायन प्रक्रियांना प्रेरित करते. होमनच्या वापरामुळे वनस्पतींमध्ये व्हॅलिन आणि ग्लूटामाइन सारख्या अ‍ॅमीनो अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे वनस्पतींमध्ये पाण्याची कमतरता आणि वाढलेल्या तापमानामुळे उद्भभवणार्‍या तणावाशी लढण्याची शक्ती निर्माण होते. होमनने बियाणांची पेरणीपूर्व प्रक्रिया केल्यास उगवण क्षमता वाढून पिकाची जोमदार वाढ मिळते.

Dose

फवारणीसाठी : ०.५ मिली ते १ मिली प्रति लिटर पाणी (पिकाच्या अवस्थेनुसार) ५० मिली ते १०० मिली प्रति एकर

Compatibility

होमनचा वापर बोर्डो मिश्रण आणि क्षारीय गुणधर्म असलेल्या रसायनांसोबत करू नये. इतर सर्व बुरशीनाशके, कीटकनाशके व विद्राव्य खतांबरोबर वापर करता येतो.

Available Packing

५० मिली 10० मिली 2५० मिली ५0० मिली १ लिटर