एक्स्टेंट पॉवर हे उच्च दर्जाचे द्रव स्वरूपातील संयुक्त खनिज खत आहे.
एक्स्टेंट पॉवर हे विशेष करून पिकांमधील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणार्या विकृती टाळण्यासाठी आणि आलेले असल्यास त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार केले गेले आहे. एक्स्टेंट पॉवर मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, नायट्रोजन, मॅग्नेशियम आणि बोरॉन या मूलद्रव्यांचा अंतर्भाव आहे. पिक मलूल दिसणे, पिवळे पडणे, नेक्रॉसीस (सड) या विविध समस्या एक्स्टेंट पॉवरच्या वापराने सोडवल्या जावू शकतात. द्रवरूप स्वरुपात असल्यामुळे वापरणे सोपे आहे. पिकांवर फवारणी केल्यानंतर २ तासाच्या आत ते पिकामध्ये कार्य करण्यास सुरवात करते आणि त्याची उच्च शोषण क्रिया कमी वेळेत चांगले परिणाम दर्शवते.
फवारणी: ५०० ते १००० मिली प्रति एकर ( २.५ ते ४ मिली प्रति लिटर पाणी) पिकाच्या स्थितीनुसार व कमतरतेनुसार हे प्रमाण वाढवले किंवा कमी केले जाऊ शकते. शिफारीस केलेले किमान प्रमाण कोणत्याही परिस्थितीत पहिल्या टप्यावर पिकावर वापरले जाऊ शकते. पिकाच्या कमतरतेची लक्षणे अदृश्य होईपर्यंत आवश्कतेनुसार पुन्हा वापर करत राहावा.
एक्स्टेंट पॉवरचा वापर फॉस्फेटिक आणि सल्फेट युक्त खतांसोबत करू नये.