इव्हान्स लॅमिनेसी कुळातील औषधी वनस्पतींपासून तयार केलेला एक नॅनो एक्सट्रॅक्ट (अर्क) आहे. यात नैसर्गिक अल्कोहोल बरोबर योग्य प्रमाणात पॉलीकेटाइड, मोनो टपेरनाईड्स तसेच सेटीटरपेन अल्कोहोल आणि एथोक्सएल्टेड नैसर्गिक तेलांमध्ये मिसळलेले सॉल्वंट असतात. इव्हान्स पिकांवर रस शोषक किटकांच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे. स्प्रे अॅडजुवन्ट सोबत वापरल्यावर इव्हान्सचे अधिक चांगले परिणाम मिळतात.
इव्हान्सची वैशिष्ट्ये :
नॅनो टेक्नॉलॉजीने तयार केलेले असल्यामुळे अतिशय प्रभावी आहे. पिकावर जास्त प्रमाणात वापरले किंवा दोन फवारण्यामधील अंतर कमी ठेवले तरी पिकांवर कोणतेही प्रतिकूल परिणाम दिसत नाही.
फवारणीसाठी २ ते ३ मिली प्रति लिटर पाणी. फवारणी आवश्यकते नुसार परत करावी. फवारणी मिश्रणात ऑरसिल हे स्प्रे अॅडजुवन्ट अवश्य मिसळावे.
सर्व प्रकारची खते आणि औषधांमध्ये मिसळून फवारणी करू शकतो.