कॅल्बी-एफ : कॅल्शियम, बोरॉन, अॅमिनो असिड सोबत चिलेशन करून तयार केलेले संयुक्त मिश्रण आहे. कॅल्शियम आणि बोरॉन प्रिय पिकांसाठी कॅल्बी-एफ हे कॅल्शियम आणि बोरॉनचे संतुलित मिश्रण आहे. कॅल्शियम आणि बोरॉन ची जास्त गरज असणार्या पिकांसाठी जसे टोमॅटो, ढोबळी मिरची, कपाशी, कोबी, डाळिंब, सफरचंद, द्राक्ष, टरबूज इ. पिकांसाठी अत्यंत प्रभावी आहे. कॅल्बी-एफ मध्ये ६% कॅल्शियम आणि ५.५% बोरॉन आहे जे पानांद्वारे जलद शोषले जाते.
वापरण्याचे प्रमाण :
कॅल्बी-एफ पाण्यात पुर्णपणे विद्राव्य आहे. ठिबक सिंचन/ड्रिप व आळवणीने मुळांच्या कक्षेत देता येते.
पिकाची स्थिती | फवारणीचे प्रमाण | ड्रिप / आळवणीसाठी प्रमाण |
---|---|---|
कमी कमतरता | १०० ग्रॅम/एकर | ८०० ग्रॅम/एकर |
मध्यम कमतरता | १५० ग्रॅम/एकर | १६०० ग्रॅम/एकर |
जास्त कमतरता | २०० ग्रॅम/एकर | २४०० ग्रॅम/एकर |
सर्वोत्तम परिणामांसाठी, फवारणी आणि आळवणीचा एकत्रित प्रयोग करावा.
फॉस्फेटिक व सल्फेटयुक्त खते व रसायने या मध्ये मिसळू नये. फवारणी कमी तापमान असतांना म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी करावी.