बायो-रिलीज कीपोटाश

पोटॅश मोबिलायझिंग बॅटेरिया (के.एम.बी) जैविक खत

किपोटॅश जमिनीतील पोटॅश वहनशील करून पिकाला उपलब्ध स्वरूपात रूपांतर करून देणार्‍या सक्रिय जिवाणुंंचे मिश्रण आहे.

किपोटॅश चे गुणधर्म:

  • जिवाणूंची एक-एक वसाहत मोठ्या प्रमाणात पोटॅश विरघळवण्याचे आणि वाहून नेण्याचे  काम करतात.
  • एकापेक्षा जास्त जिवाणूंचे मिश्रण असलेले एकमेव जैविक उत्पादन.
  • जास्त घनता असल्यामुळे किपोटॅश शिफारस केलेल्या मात्रेत उत्तम परिणाम देते.
  • द्रवरूप स्वरूप असल्यामुळे वापरण्यास सोपे.
  • स्वसंशोधित व स्वनिर्मित हायटेक बायोफर्टीलायझर लॅब मध्ये तयार होत असल्यामुळे उत्पादनाची एकसमान गुणवत्ता.

Benefits

  • जमिनीमध्ये खनिज स्वरूपात व मातीच्या कणां बरोबर स्थिरावलेला पोटॅश पिकाला उपलब्ध स्वरूपामध्ये रूपांतर करून देण्याचे काम किपोटॅश करते.
  • किपोटॅश चा वापर केल्यास रासायनिक खतांच्या वापरात वीस ते पंचवीस टक्के कपात करून सुद्धा दहा ते पंधरा टक्क्यांनी उत्पन्न वाढू शकते.
  • किपोटॅश च्या वापराने जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.
  • किपोटॅश चा वापर पिकाची रोग व कीड विरोधात प्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करते.
  • किपोटॅश चा वापर पिकाला जैविक व अजैविक तणावापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
  • किपोटॅश मधील जिवाणू काही फायटोहार्मोन्स एंजाइम्स, सेंद्रिय आम्ल तसेच पॉलिसेकेराइडस्चीनिर्मिती करतात म्हणून याला प्लांट ग्रोथ प्रमोटिंग रायझोबॅटेरिया (झॠझठ) म्हणून सुद्धा ओळखले जाते.
  • किपोटॅश मधील काही जिवाणू सायडोरोफोअर्स ची निर्मिती करतात जे जमिनीमधील धनभारीत अन्नद्रव्यांचे चिलेशन करण्यास मदत करते.
  • किपोटॅश मधील जिवाणू पोटॅशला उपलब्ध करतातच, त्याच बरोबर मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि मँगनीज या अन्नद्रव्यांना पण विस्थापित करतात त्यामुळे त्यांची सुद्धा उपलब्धता वाढते.
  • किपोटॅश मधील जिवाणू फळे, भाज्या आणि धान्याची गुणवत्ता वाढवण्यास मदत करते.
  • किपोटॅश च्या वापराने उत्पादनात १० ते १५% वाढ होऊ शकते.

Dose

किपोटॅश चा वापर १ लिटर प्रति एकर या प्रमाणात ड्रिप द्वारे, ड्रेंचींग द्वारे अथवा सेंद्रिय खतांमध्ये मिश्रण करून करावा. वापरत असताना जमिनीमध्ये वाफसा स्थिती असणे आवश्यक आहे.

Available Packing

५०० मिली १ लिटर