फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅटेरिया (पी.एस.बी) जैविक खत
किफॉस हे जमिनीतील फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू युक्त जैविक-खत आहे, यामध्ये अशा जीवाणूंचा समूह आहे जो सेंद्रियआम्ल, विकरे (एन्झाईम्स) (ऍसिड फॉस्फेटेज), प्रतिजैविक संयुगे आणि फायटो-हार्मोन्स यांसारख्या काही चयापचय क्रियांसाठी आवश्यक घटकांच्या निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका बजावतात. हे सूक्ष्मजीव फॉस्फेटच्या काही अविद्राव्य स्वरूपाचे बंध तोडण्यात, फॉस्फेट गट वेगळे करण्यात आणि कटायन चीलेटिंग करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
वैशिष्ट्ये:
सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि वनस्पतींच्या वाढीस उत्तेजन देणार्या पदार्थाची निर्मिती.
इतर सूक्ष्म घटकांची सुलभता वाढवणे.
अजैविक तणावाचा प्रतिकार करणे.
माती चे आरोग्य व्यवस्थापित करणे.
मुळांच्या सानिध्यात सूक्ष्मजीवाणुंची कार्यक्षमता वाढवणे.
जमिनीतुन देण्यासाठी : १ लिटर किफॉस हे ५० किलो गांडूळ खत/कंपोस्ट खत/सेंद्रिय (ओरीजीनो ) या पैकी एका खतामध्ये मिसळावे आणि इष्टतम ओलावा टिकवून ठेवावा. पेरणीच्या वेळी एक एकर जमिनीत मिसळून द्यावे . ड्रेंचिंग/आळवणी : १ लिटर किफॉस २०० लिटर पाण्यात मिसळा, पिकांच्या मुळांच्या भागात एक एकर क्षेत्रावर वापरा. ठिबक सिंचन : एक एकरासाठी ठिबकद्वारे १ लिटर द्या.
किफॉस इतर जैव खते आणि जैव-बुरशीनाशकां सोबत एकत्र देता येते.