बेंथिक हे पिकांसाठीचे एक नैसर्गिक जैव उत्तेजक आहे. बेंथिक हे Ascophyllum Nodusum या समुद्रातील शेवाळावर किण्वन प्रक्रीये द्वारा तयार केले आहे. ह्यामध्ये नैसर्गिक संप्रेरके, खनिजे, कर्बोदके व प्रथिने आहेत. हे सेंद्रिय प्रमाणित उत्पादन आहे.
फवारणीसाठी : २ मिली प्रति लिटर पाणी.
वाढीच्या अवस्थेत, फुले येण्याच्या आणि फळांच्या विकासाच्या अवस्थेत.
ड्रिपद्वारे : १.५ ते २.० लिटर प्रति एकर (२ ते ३ वेळा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार).
सर्व किटकनाशके, बुरशीनाशके आणि खते (रासायनिक खते) यामध्ये मिश्रण करून वापरता येते. तरी पण मिश्रण करण्याअगोदर जार चाचणी करून घ्यावी.