अॅम्पल ची वैशिष्ट्ये:
अॅम्पल पाण्यामध्ये पुर्णपणे विरघळणारे पिकांसाठीचे जैविक उत्तेजक आहे. अॅम्पल शुध्द नैसर्गिक अमिनो असिडवर आधारित एक अद्वितीय उत्पादन आहे. पिकांच्या विविध अवस्थांमध्ये संपुर्ण पोषणासाठी अजैविक ताणावर मात करून अॅम्पलच्या वापरामुळे पिक सशक्त होते. अॅम्पल हे वनस्पती, प्राणी आणि मानवांसाठी सुरक्षित, सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणीत आहे.
अॅम्पल वेगळे कसे आहे ?
पिकांच्या वाढीच्या अवस्थेत २३ प्रकारचे महत्वाचे अमिनो असिड आवश्यक आहेत. त्यांच्या नैसर्गिक निर्मितीतील कमतरतेमुळे पिकाच्या उत्पादन आणि गुणवत्तेवर अनिष्ठ परिणाम होतो, अॅम्पल दिल्याने या अमिनो असिडची पूर्तता होते आणि पिक तजेलदार होते.
अॅम्पल असे उत्पादन आहे, ज्याच्या विविध विद्राव्य खतांसोबत वापरामुळे (फवारणी केल्याने) त्यातील अमिनो असिड या खतांची कार्यक्षमता वाढवता त्यामुळे त्यातील अन्नद्रव्यांचा पिक पुरेपुर उपयोग करून घेते.
२.५ ते ४ मिली प्रति लिटर पाणी (वातावरणातील बदलानुसार)
बोर्डो मिश्रण आणि अल्कधर्मी औषधे वगळता इतर सर्व बुरशीनाशके, किटकनाशके आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये मिसळून अॅम्पलची फवारणी केली जाऊ शकते. सर्वोत्तम परिणामासाठी, फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.