ब्लॉग डिटेल

  • सस्पेंशन खते: 10 पट जलद शोषण आणि उच्च उत्पन्न

    सस्पेंशन खते: 10 पट जलद शोषण आणि उच्च उत्पन्न

    Posted on : 13 Dec 2025 By : Agri Search (India) Pvt. Ltd

    सस्पेंशन खते: 10 पट जलद शोषण आणि उच्च उत्पन्न

     

    आज शेती इतक्या प्रगत टप्प्यावर आली आहे की मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये त्यांच्या विद्राव्य मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात द्रवरूपात पिकांना देणे शक्य झाले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाला सस्पेन्शन फर्टीलायझर्स असे म्हणतात.

    भारतात स्वदेशी तंत्रज्ञानातून ही उत्पादने तयार होणे ही अभिमानाची बाब आहे.


    सस्पेन्शन खतांची मुख्य वैशिष्ट्ये

    1. अतिसूक्ष्म कण आकार (1–5 मायक्रॉन)

    कोलॉइडल मिल तंत्रज्ञानामुळे:

    • प्रत्येक कण स्थिर राहतो

    • अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात

    • पानांद्वारे व मुळांजवळून जलद शोषण होते

    2. उत्कृष्ट प्रवाहीपणा

    • दाट असूनही स्प्रेयरमधून सहज जाते

    • नोजल ब्लॉकेज होत नाही

    • फवारणी समान होते

    3. उच्च स्थिरता

    • दीर्घकाळ साठवणीत लेयरिंग होत नाही

    • हलके शेक केल्यावर लगेच एकसंध बनते

    • तापमान व pH बदलातही तुटत नाही


    पारंपरिक खतांपेक्षा वेगळे फायदे

    • एकाच फॉर्म्युलेशनमध्ये जास्त पोषण

    • विद्राव्य मर्यादेपेक्षा अधिक अन्नद्रव्य देण्याची क्षमता

    • जलद व प्रभावी शोषण

    • कमी डोस – जास्त परिणाम

    • सर्व हवामानात स्थिर कार्यक्षमता


    विशेष नैसर्गिक पॉलिमर – खरी ताकद

    हा पॉलिमर:

    • कणांना स्थिर ठेवतो

    • पानांवर उत्कृष्ट चिकटण्याची क्षमता देतो

    • पोषकद्रव्ये जास्त काळ पानांवर ठेवतो

    • शोषण व उपयोगिता वाढवतो


    परिणामकारकता

    सस्पेन्शन फर्टीलायझर्समुळे:

    • झपाट्याने वाढ

    • चांगला हिरवा रंग

    • फुलधारणा व फळधारणा सुधारते

    • उत्पादन व दर्जा वाढतो

     

    कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी ही आधुनिक आणि परिणामकारक फीडिंग टेक्नॉलॉजी आहे.