सिट्रस पील एक्सट्रॅक्ट + ऑर्गेनो सिलिकॉन आधारित आधुनिक स्प्रे ॲडज्युव्हंट — INFUZE
फवारणीमध्ये औषधाची गुणवत्ता जितकी महत्त्वाची असते, तितकाच ॲडज्युव्हंटचा योग्य वापरही परिणामकारक ठरतो. सिट्रस पील एक्सट्रॅक्ट आणि ऑर्गेनो सिलिकॉन यांचा संयोग असलेले INFUZE हे आधुनिक, सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी स्प्रे ॲडज्युव्हंट आहे.
सिट्रस पील एक्सट्रॅक्ट म्हणजे काय ?
संत्रा, लिंबू आणि मोसंबी यांच्या सालीतून मिळणाऱ्या नैसर्गिक तेलांमध्ये डी-लायमोनीन, टर्पिन्स आणि नैसर्गिक सर्फॅक्टंट्स असतात. हे घटक पानांवरील मेणासारखा थर सैल करून औषध पानावर समप्रमाणात पसरायला मदत करतात व पेशींमध्ये शोषण वाढवतात. त्यामुळे फवारणीचा परिणाम 25 ते 30 टक्क्यांपर्यंत अधिक मिळतो.
ऑर्गेनो सिलिकॉनचे महत्त्व :
ऑर्गेनो सिलिकॉन हा सुपर स्प्रेडर म्हणून ओळखला जातो. त्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
-
पाण्याचा थेंब पानावर त्वरित पसरतो
-
रंध्रांत प्रवेश होऊन औषधाचे शोषण वाढते
-
औषध पानांवरून वाहून जात नाही
-
कमी पाण्यात अधिक क्षेत्रावर कव्हरेज मिळते
दोन्ही एकत्र आल्यावर होणारा परिणाम
सिट्रस पील एक्सट्रॅक्ट मेणाचा थर सैल करतो आणि ऑर्गेनो सिलिकॉन औषध आत पोहोचवतो. त्यामुळे डबल अॅक्शन आणि अधिक कार्यक्षम परिणाम मिळतो.
मधमाशी आकर्षणासाठी उपयोग
सिट्रसचा नैसर्गिक सुगंध असल्यामुळे मधमाशा फुलांकडे आकर्षित होतात. त्यामुळे परागीभवन सुधारते आणि फळधारणा वाढते. हा उपयोग विशेषतः डाळिंब, संत्रा, मोसंबी, आंबा, कांदा आणि भाजीपाला पिकांमध्ये महत्वाचा आहे.
मेणाच्या जाड थर असलेल्या पानांवर उपयोग
कापूस, द्राक्ष, डाळिंब, कांदा आणि कोबी सारख्या पिकांच्या पानांवर मेणासारखा जाड थर असतो. INFUZE हा थर सैल करून औषधाचे शोषण वाढवते.
डाळिंबात इथेफॉनसोबत वापर फायदेशीर का
इथेफॉन पानगळीसाठी वापरतात, परंतु मेणाचा थर असल्यास परिणाम कमी होतो. INFUZE सोबत वापरल्यास इथेफॉन आत शोषला जातो, एकसारखी पानगळ होते आणि फुलोऱ्याचा प्रतिसाद सुधारतो.
वापराची मात्रा
15 लिटर पाण्यासाठी 7.5 ते 15 मिली
कोणत्याही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा वनस्पती संजीवकासोबत मिसळता येते.
निष्कर्ष
INFUZE हे फवारणीची ताकद वाढवणारे, परिणाम सुनिश्चित करणारे आणि खर्च वाचवणारे आधुनिक स्प्रे ॲडज्युव्हंट आहे.