ब्लॉग डिटेल

  • फॉस्मॅजिकच्या शक्तीने सोयाबीनमध्ये फांद्यांची वाढ वाढवा

    फॉस्मॅजिकच्या शक्तीने सोयाबीनमध्ये फांद्यांची वाढ वाढवा

    Posted on : 12 Jul 2025 By : Agri Search (India) Pvt. Ltd

    फॉस्मॅजिकच्या शक्तीने सोयाबीनमध्ये फांद्यांची वाढ वाढवा

    सोयाबीन शेतीमध्ये अधिक फांद्या म्हणजे अधिक फुले, अधिक शेंगा आणि शेवटी अधिक उत्पादन. पण बऱ्याच शेतकऱ्यांना कमी फांद्यांचा प्रॉब्लेम येतो, ज्यामुळे उत्पादन थेट कमी होते.

    फांद्या कमी का होतात?

    • अन्नद्रव्यांचे असंतुलित वापर (नायट्रोजन जास्त, फॉस्फरस कमी)

    • मुळांची कमकुवत वाढ

    • झिंक व बोरॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता

    • सुरुवातीच्या अवस्थेत कमी वाढ

    या सगळ्यामुळे झाडे उंच तर होतात, पण त्यांना बाजूच्या फांद्या कमी येतात आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.

    फॉस्मॅजिक – फांद्या वाढवणारे योग्य संतुलन

    फॉस्मॅजिक (5-40-14 + S, Mg, Zn, B) हे एक विशेष रचना असलेले फर्टिलायझर आहे, जे सोयाबीनमध्ये मजबूत व आरोग्यदायी फांद्या वाढवते:

    • फॉस्फरस (40%) – खोल मुळे आणि सुरुवातीच्या फांद्यांची वाढ

    • झिंक व बोरॉन – फांद्यांची निर्मिती व फुलधारणा सुधारण्यासाठी

    • मॅग्नेशियम व पोटॅश – मजबूत खोड आणि आरोग्यदायी शेंगांची निर्मिती

    • नायट्रोजन कमी (5%) – झाडाची उंची अनियंत्रित वाढू नये म्हणून

    फॉस्मॅजिक कधी वापरावे?

    पेरणीनंतर 15 ते 25 दिवसांच्या दरम्यान फॉस्मॅजिकचा वापर करावा – ही अवस्था फांद्या वाढण्यासाठी आणि झाडाचा बेस तयार होण्यासाठी अत्यंत महत्वाची असते.

    दृश्यमान परिणाम:

     

    • अधिक बाजूच्या फांद्या

    • अधिक फुले व शेंगा

    • मजबूत झाडाची रचना

    • प्रति एकर अधिक उत्पादन