टोमॅटो पिकामध्ये स्क्लेरेटियम बुरशीचा धोका
जर टोमॅटोची झाडं अचानक वाळू लागली असतील, विशेषतः फुलोऱ्याच्या किंवा फळधारणेच्या टप्प्यावर, तर ती स्क्लेरेटियम बुरशी (Sclerotium rolfsii) मुळे होण्याची शक्यता आहे. ही बुरशी जमिनीतून येते आणि झाडाच्या बुडाशी म्हणजेच जमिनीच्या पातळीवर हल्ला करते. त्याठिकाणी पांढऱ्या कापसासारख्या बुरशीसदृश वाढीबरोबरच लहान तपकिरी दाणेसारख्या संरचना (स्क्लेरोशिया) दिसतात.
ही बुरशी उष्ण व दमट हवामानात, विशेषतः पाणथळ किंवा नीट कुजलेले खत न वापरलेल्या शेतात लवकर पसरते. एकदा झाड लागण झालं की काही दिवसांत ते पूर्ण वाळून जाते.
नियंत्रणाची प्रभावी उपाययोजना
-
रोपांची लावणी करण्याआधी त्रायकोडर्मा आणि निमखोरे मातीमध्ये मिसळून वापरावं.
-
उंच वाफे तयार करून लावणी करावी जेणेकरून पाण्याचा साठा होणार नाही.
-
अति पाणी देणे टाळा आणि चांगली निचरा व्यवस्था ठेवा.
-
लक्षण दिसताच झाडं उपटून नष्ट करा, शेतातच टाकू नका.
-
गरज असल्यास झाडाच्या बुडाशी कार्बेन्डाझिम किंवा टेबुकोनाझोल यापैकी कुठलाही एक फंगीसाइड वापरून भिजवून द्यावे. (हे जैविक घटकांबरोबर मिसळू नयेत.)
शेत स्वच्छ व रोगमुक्त ठेवणे आणि योग्य वेळेवर प्रतिबंध घेणे हेच स्क्लेरेटियम बुरशीपासून संरक्षणाचे उत्तम मार्ग आहेत.