सेंद्रिय कर्ब – जमिनीच्या आरोग्याचा खरा पाया

  • मुखपृष्ठ
  • सेंद्रिय कर्ब – जमिनीच्या आरोग्याचा खरा पाया
  • सेंद्रिय कर्ब – जमिनीच्या आरोग्याचा खरा पाया

    सेंद्रिय कर्ब – जमिनीच्या आरोग्याचा खरा पाया

    Posted on : 28 Jan 2026 By : Agri Search (India) Pvt. Ltd

    सेंद्रिय कर्ब – जमिनीच्या आरोग्याचा खरा पाया

    आज भारतीय शेतीमध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्बाची (Organic Carbon) कमतरता हा सर्वात गंभीर व वाढता प्रश्न आहे. रासायनिक खतांचा अति वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, खोल नांगरट, पीक अवशेष न कुजू देणे आणि सूक्ष्मजीवांची घटती संख्या यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे.

    सेंद्रिय कर्बाचे महत्त्व काय

    मातीमध्ये किमान 0.75 ते 1.0 टक्के सेंद्रिय कर्ब असणे आवश्यक मानले जाते. सेंद्रिय कर्बामुळे मातीची भुसभुशीत रचना टिकते, सूक्ष्मजीव वाढतात, पाणी धारणक्षमता वाढते, अन्नद्रव्यांचे शोषण सुधारते आणि मातीचा जैव रासायनिक समतोल राखला जातो.

    कमी उत्पादनाचे खरे कारण

    अनेकवेळा कमी उत्पादनाचे कारण खतांची कमतरता नसून, सेंद्रिय कर्बाची कमतरता असते. कारण सेंद्रिय कर्ब कमी असल्यास माती अन्नद्रव्ये धारण करू शकत नाही.

    सेंद्रिय कर्ब कुठे कार्य करतो

    सेंद्रिय कर्ब मुख्यतः जमिनीच्या 0 ते 15 सें.मी. खोलीपर्यंत सर्वाधिक प्रभावी असतो. म्हणून सेंद्रिय घटक याच खोलीत मिसळणे परिणामकारक ठरते.

    किती सेंद्रिय खत लागते

    शास्त्रीय गणनेनुसार 1 हेक्टर क्षेत्रात 15 सें.मी. खोलीपर्यंत सेंद्रिय कर्ब 1 टक्क्याने वाढवण्यासाठी 25 ते 30 टन सेंद्रिय खत आवश्यक असते. म्हणजेच प्रति चौ.मीटर 2.5 ते 3 किलो सेंद्रिय खत आवश्यक.

    सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे मार्ग

    कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, पीक अवशेष व सूक्ष्मजीव जैविक उत्पादने यांचा वापर सातत्याने केल्यास सेंद्रिय कर्ब वाढतो. यासाठी अॅग्री सर्च इंडिया प्रा. लि चे ओरिजिनो हे सेंद्रिय खत एक योग्य पर्याय मानले जाते.

    निष्कर्ष

     

    सेंद्रिय कर्ब वाढवणे हा एका हंगामाचा विषय नसून सातत्याची प्रक्रिया आहे. परंतु एकदा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला की उत्पादन टिकाऊ होते, रासायनिक खतांची गरज कमी होते आणि मातीचे आरोग्य सुधारते.